Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या ग आणि फ प्रभागात मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई सुरुच

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

डोंबिवली (पूर्व) ग प्रभाग क्षेत्रातील बिगर निवासी मालमत्तांना वारंवार भेटी व नोटीस देवून सुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागाचे सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी यांनी थकबाकी पोटी बिगर निवासी मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई बुधवारी केली.
यामध्ये डोंबिवली (पूर्व) मानपाडा रोड कस्तुरी प्लाझा येथील मालमत्ता क्र. G01001703500 यांच्या रक्कम रु. 20 लाख 58 हजार 191 इत‍क्या थकबाकी पोटी शितल ॲकेडमी व सोहम क्लासेस सिल करण्यात आले.

तर फ प्रभागात सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने श्रीजी पॅलेस मधील  सदनिका क्रमांक 501, मालमत्ता क्रमांक F01014490700 ही  रक्कम रु. 1 लाख 55 हजार 266 इतक्या थकबाकीपोटी सिल  केली. तसेच ओरिएंट सोसायटी  येथील सदनिका क्रमांक c /409, मालमत्ता क्रमांक F01001864500ही थकबाकी रक्कम रु. 1 लाख 397 इतक्या थकाबाकीपोटी  सिल करण्यात आली.

Post a Comment

0 Comments