"गट तटाचे राजकारण सहन केले जाणार नाही "– शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुरबाड येथे कल्याण मुरबाड विधानसभा जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड शहर आणि तालुका आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अरविंद मोरे यांनी आपल्या भाषणात मुरबाड मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली असून मुरबाड मध्ये सुद्धा फक्त बेरजेच राजकारण सुरू असून लवकरच अनेक पक्षाचे पदाधिकारी प्रवेश करतील असे प्रतिपादन केले. गट तटाचे राजकारण सहन केले जाणार नाही असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अनेक पदाधिकारी यांना पदे देण्यात आली. तसेच मुरबाड तालुक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते, नवनिर्वाचित नगरअध्यक्ष संतोष चौधरी तसेच मुरबाड आगार व्यवस्थापक यांच्या बरोबर आगारातील बस सेवा कल्याण मुरबाड फेरी वाढविणे बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments