ब्लॅक अँड व्हाईट कल्याण:(प्रतिनिधी)
लेवा पाटीदार समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व लेवा भूषण सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार व नेत्रदान सोबत देहदान चळवळीचे पुरस्कर्ते सुनील इंगळे यांना इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड्स हा पुरस्कार संबंधित इंटरनॅशनल संस्थेचे कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदीप ईश्वर पाटील सर यांच्या शुभहस्ते व सोबत प्राध्यापक जयंत राणे व योगाचार्य प्रमोद शिंदे हे उपस्थित होते. नेहमीच निष्काम कर्मयोगी कार्यात दखलपात्र कार्य केल्याबद्दल ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. राष्ट्रभक्तीचे ज्योत तेवत ठेवणे समर्पित भावनेने निरपेक्षपणे सेवावृत्ती होऊन कर्मयोग करणे सहकार्यांना प्रोत्साहित करून नवचैतन्य निर्माण करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. नेत्रदान व देहदानाचे ते पुरस्कर्ते असून यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. इंगळे यांचे सामाजिक काम हे दैदित्य मान आणि जबरदस्त असून नेहमीच ते स्वयंस्फूर्तीने समाजकार्यात झोकून देऊन कार्यरत असतात विविध संस्थांनी त्यांच्या या निरपेक्ष समाजसेवेची निर्भीड पत्रकारितेची दखल घेऊन अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास 65 पेक्षा अधिक राज्यस्तरीय पुरस्काराने व एका राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, या यशाबद्दल सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments