ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीतील त्या 65 इमारती अनधिकृत असल्याचे न्यायालयाचे आदेश आहे.या इमारतीतील सुमारे साडे सहा हजार नागरिक बेघर होणार आहे. मात्र त्यांचा संसार उघड्यावर पडू देणार नाही असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भूमिका घेतली आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट ) हे इमारतीतील रहिवाशांच्या मदतीला आली आहे.जबाबदार अधिकाऱ्यांचे जोवर निलंबन होत नाही त्याआधी इमारतीवर हतोडा मारल्यास आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार गट ) चे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील व मधुकर माळी यांनी हा इशारा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना भालचंद्र पाटील म्हणाले, त्या 65 इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली आहे. आम्ही न्यायालयाचा आदेशाचा आदर करतो.पोलिसांना माझी विनंती करतो की त्यांनीही माणुसकीच्या दृष्टीकोनातून रहिवाशांना त्रास देऊ नका. आम्हाला असा प्रश्न पडतो की या सर्व प्रकारात जबाबदार अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही? इमारतीवर कारवाई आणि अधिकाऱ्यांना मोकळे सोडले जाते असे योग्य नाही. आम्ही प्रशासनाला इशारा देतो की, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न करता इमारतीवर हतोडा चालवला तर आम्ही कल्याणमधील पालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषण करू.
प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. या इमारतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद पवार ) शिष्टमंडळ पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेईल.
Post a Comment
0 Comments