ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो.
महाराजांच्या जन्माचा इतिहास
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या 'शिवनेरी' या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इ.स. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील 'शिवाई' देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शिवाजी महाराजांचे नाव 'शिवाई' या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते.
शिवजयंतीची सुरुवात कशी झाली?
लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा घातला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं, त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला, जी परंपरा आजही चालू आहे. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ
अनेक वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. म्हणून यानिमित्ताने आपण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ पाहणार आहोत. तसेच भोसले या घराणेशाहीचा देखील इतिहास अनुभवणार आहोत. यामध्ये आपण महाराजांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Post a Comment
0 Comments