शिवसेना ठाकरे गट, मनसे व वंचितच्या नेत्यांनी घेतली दाखल
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवार 12 तारखेला घडली. या प्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात महिलेचे पती व नातेवाईकांना ठिय्या आंदोलन केले. याची दाखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, अभिजित सावंत आदीसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत,प्रेम पाटील, रितेश म्हात्रे, राजू पाटील, दिनेश वाघ, अश्विन पाटील, अनुपमा दळवी, श्रद्धा किरवे आदी मनसैनिक व वंचितचे पदाधिकारी यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला जाब विचारला.
डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथील सुवर्णा सरोदे यांना 11 फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.या घटनेनंतर दुसऱ्या शुक्रवारी महिलेचे पती व नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.अजूनही पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल नाही असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.दुसऱ्या दिवशी शुक्रवारी महिलेचे पती व कुटुंबियांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
काही वेळाने शिवसेना ठाकरे गट, मनसे व वंचित पदाधिकाऱ्यांनी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांची भेट घेतली.काही वेळ चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने लेखी हमी पत्र दिली.वैद्यकीय स्तरावर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून समितीमार्फत चौकशी करण्यात येईल.
प्रशासकीय त्रुटीबाबत पालिका स्तरावर चौकशी समिती बनवून शनिवार 14 तारखेला ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक पथक शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देऊन चौकशी करतील. या घटनेची चौकशी अंती दोषी आढल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद आहे.यावेळी आमदार राजेश मोरे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेत दोषी आढल्यास कारवाई होईल असे सांगितले.
डॉक्टरांनी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया केली, मात्र ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. डॉक्टरांनी रक्ताची कमतरता असल्याचे सांगून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू केले. काही वेळानंतर त्यांना बाहेर आणून तब्येत सुधारेल असे सांगण्यात आले, पण त्यांच्या प्रकृतीत कुठलाही सुधार दिसून आला नाही.सुवर्णा यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, याच दरम्यान महिलेची गर्भाशय (पिशवी) काढण्यात आली व याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना आधी कुठलाही सल्लामसलत न करता केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.सायन रुग्णालयात हलविण्याची गरज आहे असे सांगितले. मात्र या दरम्यान तिची आणि आमची भेट होऊ दिली नाही त्यामुळे तिचा मृत्यू 2 तास आधीच झाला असल्याचा आरोप देखील महिलेच्या नवऱ्याने केला आहे .मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्याने सुवर्णा यांनी अखेरचा श्वास घेतला.
Post a Comment
0 Comments