Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

 

भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्स

माफियांवर कठोर कारवाईची केली मागणी  

        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण (कुणाल म्हात्रे)

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भिवंडीतील वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्स माफियांच्या आतंकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

खासदार सुरेश म्हात्रे यांनी गृहमंत्र्यांना सांगितले की भिवंडीमध्ये गुन्हेगारी आणि अवैध ड्रग्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहेत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये गुजरात एटीएसने भिवंडी येथून 792 किलो लिक्विड एमडी ड्रग्स जप्त केली होतीज्याची किंमत 800 कोटी रुपये आहेमात्र या प्रकरणातील प्रमुख दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

खासदार सुरेश म्हात्रे यांनी ड्रग्स माफियातडीपार गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेचभिवंडीतील ड्रग्स व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी विशेष तपास समिती किंवा केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या आणि तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments