ब्लॅक अँड व्हाईट झिडके-अंबाडी वार्ताहर
केंद्र सरकारने भारतीय संसदेमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 (BNS),भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) व भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन नवीन कायदे पारित केले असून,त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्यांना नवीन कायद्यांची ओळख करून देण्यासाठी गणेशपुरी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पत्रकार यांच्याबरोबर सुसंवाद साधून आपली कामगिरी बजावली आहे.
पत्रकार दैनंदिन बातम्यांचे संकलन करीत असतानाच,विविध स्वरूपातील घटनांबद्दल पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे नोंद केले जातात,भारतीय संसदेने नवीन तीन कायदे जे पारित केले आहेत,या नवीन कायदेविषयक पत्रकार यांना माहिती व्हावी यादृष्टीकोनातून ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॅ.डी.एस्.स्वामी यांच्या मार्गदर्शन सूचनेवरून सहा.पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्याकडून पत्रकारांबरोबर सुसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस आतापर्यंत अगदी इंग्रज राज्यकारभारापासुन अस्तित्वात असणारी कायदेसंहिता म्हणजेच IPC (इंडियन पीनल कोड) नुसार 424 या गुन्ह्य़ासाठी नवीन कायद्याने 118 या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात येईल.302 खुनाच्या गुन्ह्य़ात यापुढे 103 गुन्हा नोंदविण्यात येईल.376 बलात्कार या गुन्ह्य़ात यापुढे 64 या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात येईल.अशा प्रकारे भारतीय संसदेने जे नवीन तीन कायदे पारित केलेले आहेत,त्यांची अंमलबजावणी पोलीस खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या कामकाजासाठी वापर केला जाणार आहे,याची माहिती लोकशाहीतील चौथा स्तंभ पत्रकार यांच्याकरिता आवश्यक बाब म्हणून पत्रकार सुसंवाद सभेचे उद्दिष्ट होते.यावेळेस पत्रकार-दीपक हिरे,विजय गायकवाड, विनोद पाटील,दीपक देशमुख,शिवाजी राऊत आदिंची उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments