ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड-प्रतिनिधी(दिलीप पवार)
संत शिरोमणी, जगद्गुरु तुकाराम महाराज यांची 417 वी जयंती प्रथमच मुरबाड मध्ये साजरी करण्यात आली. संपुर्ण जगाला भक्ती आणि शक्ती यांचा संगम करून तत्कालीन समाजव्यवस्थेवर कडाडुन विरोध करुन समाजातील कर्मकांड, अनिष्ठ रूढी, परंपरा यांना छेद देऊन आपल्या अभंग वाणीतून समाजिक प्रबोधन करणारे महान संत म्हणून आज तुकाराम महारांजाकडे पाहिले जाते.वारकरी सांप्रदाय संत तुकाराम महाराजांना आदर्श म्हणून पाहतात. अशा या थोर संताची महाराष्ट्रात तुकाराम बिज साजरी केली जाते परंतु जयंती साजरी होताना दिसत नाही.परंतु मुरबाड मधिल छत्रपती संभाजी नगर येथिल कै.गोविंद भोईर गुरूजी चौकात 2 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
जनसेवा शिक्षण मंडळ शिवळे विद्यालयाचे प्राचार्य यशवंत धलपे सर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश साबळे, सोपान गोल्हे, उमेश पाटील, भालचंद्र गोडांबे, दादाजी यशवंत राव,निलेश गायकर, संतोष चौधरी, ज्योतीताई गोडांबे, पत्रकार दिलीप पवार, अरूण ठाकरे,शंकर गोहिल,रविंद्र भोईर, प्रविण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे प्रतिमा पुजनावेळी तुकाराम गाथा व भारतिय संविधानाचे पुजन करण्यात येऊन अनेक मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांवर प्रकाश झोत टाकला.
Post a Comment
0 Comments