ब्लॅक अँड व्हाईट झिडके- अंबाडी वार्ताहर
मंत्रालय स्तरावरील कामे करण्यासाठी राज्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या अपेक्षेने येत असतात,परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने नागरिकांना सकाळी किमान 11 वाजता पासून प्रवेश प्रक्रिया बंद करून,दुपारी 2 वाजता वेळ ठेवल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत असल्यामुळेच नागरिकांची सद्यस्थितीत शासनाविरोधात तीव्र नाराजी आहे.
मंत्रालय स्तरावरील कामे ही अन्यायकारक असल्यामुळेच याबाबतीत आपणास नक्कीच न्याय मिळेल या भावनेने नागरिक मंत्रालयात येत असतात, परंतु मंत्रालय प्रशासनाने नागरिकांसाठी ही वेळ सकाळी 11 वाजता प्रवेशाऐवजी दुपारी 2 वाजताची ठेवल्याने नागरिकांची अपेक्षेप्रमाणे कोणतीच कामे होत नाहीत,तर मोठ्या नाराजीने घरी परतावे लागते,ही केवळ नाराजी नसून,मोठी कुचंबणा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त याप्रमाणे मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपत्र घेणे बंधनकारक असल्यामुळे राज्यभरातील अनेक ठिकाणांहून नागरिक येत असतात.प्रवेशपत्र ओळखपरेड करिता भल्या मोठ्या रांगेत नागरिकांना तासनतास प्रतिक्षा कराव्या लागतात,त्यानंतर आपल्या कामासाठी मिळणारा वेळ अपुरा असतो,त्याचबरोबर ज्या-ज्या विभागात संबंधित कामे असतात, तेथील मंत्री महोदय किंवा अधिकारी तसेच कर्मचारीवर्ग दुपारनंतर भेटणे दुरापास्त होते,आणि शेवटी नियोजित कामे न होताच निराश होऊन नागरिकांना घरी परतावे लागत आहे,ही वस्तुस्थिती अजिबात नाकारता येण्यासारखी नाही.मंत्रालयात येणारे नागरिक अगदी अबाल-वृद्धांपासुन अनेकांचा समावेश यामध्ये आहे,की ज्यांना मंत्री महोदय किंवा अधिकारी यांना भेटण्यासाठी तासनतास ताटकळत राहावे लागत आहे,ही परिस्थिती बदलण्यासाठी मंत्रालयीन प्रशासनाने नागरिकांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी योग्य तो पर्याय काढावा,व नागरिकांची कामे करण्यासाठी सकाळी 11 वाजतापासूनची वेळ देण्याची मागणी तमाम महाराष्ट्रातील नागरिकांकडून राज्य शासनाला करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments