Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने घेतली परिवहन मंत्र्यांची भेट

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रॅपिडो बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक परवानगी सक्त विरोध व इ -रिक्षांना महापालिका नगरपालिका शहरी भागात परवानगी देऊ नये ग्रामीण भागातच परवानगी द्यावी इ- रिक्षांना परवाना सक्ती करावा नवीन रिक्षा टॅक्सी परवाने वाटप तात्काळ स्थगिती द्यावी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सरकारने मंजूर केलेले कल्याणकारी महामंडळ अमलबजावणी करण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने केली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी शिष्टमंडळाने घेतली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची ठाणे येथे भेट घेतली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर,  विनायक सुर्वेजितेंद्र पवारसंतोष नवलेमहेश कदमगजानन पाटीलविजय डफळबंडु वाडेकरसुभाष चव्हाण,  रफीक शेखतेजस सांमतविलास चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बाईक प्रवासी वाहतूक धोकादायक आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्रातील वाहन चालवताना वाहन कायदा नियम तरतूद यानुसार चालकाचे लायसन्स  ट्रान्स्पोर्ट  स्वरुपात असावे लागते. प्रवासी वाहतूक वाहन चालकास  ट्रान्स्पोर्ट लायसन्स व बॅच नियमानुसार बंधनकारक आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक वाहन चालकास पोलिस व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. कोणत्या निकषावर रॅपिडो बाइक प्रवासी वाहतूक परवानगी परिवहन प्रशासनाने दिली व पेट्रोल सीएनजी इंधनावर चालणाऱ्या रिक्षांना परवाना व परवाना शुल्क भरणे बंधनकारक आहे. इ -रिक्षांना परवाना सक्ती का नाही असे प्रश्न परिवहनमंत्री यांना दिलेल्या निवेदनात कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी उपस्थित केले आहेत.  

शासन परिवहन रिक्षा टॅक्सी परवाने वाटप खुले केलेले आहे. नवीन रिक्षा टॅक्सी परवाने बंद करावे अशी रिक्षा टॅक्सी संघटनांची मागणी आहे. अद्याप आरटीओकडुन नवीन रिक्षा टॅक्सी परवाने वाटप सुरूच आहे. परिणामत: रिक्षांची संख्या प्रत्येक शहरात अमाप वाढलेली आहे. भरमसाठ रिक्षा टॅक्सी संख्या वाढ यामुळे रिक्षा चालकांचे उत्पन्न घटून अत्यल्प झालेले आहे. लवकरच बैठक घेऊन कल्याणकारी महामंडळ अमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा संघटना शिष्टमंडळास दिले.


Post a Comment

0 Comments