ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या "अ" प्रभागक्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाचे पेव फुटले असल्याने दोन दिवसापूर्वी "अ" प्रभाग सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्विकारलेल्या प्रमोद पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांना चाप बसावा याकरिता धडक अँक्शन प्लान राबवित अनाधिकृत बांधकामवर पाडकाम कारवाईचा बडगा उगारला आहे.
"अ" प्रभाग क्षेत्रातील मोहने, अटाळी, आंबिवली, टिटवाळा, मांडा, गणेश वाडी, बल्याणी उंभर्णी बंदरपाडा परिसरात अनाधिकृत बांधकामचा सुळसुळाट झाला होता. तत्कालीन अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या कारकिर्दीत म्हणवी तशी अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई झाली नसल्याच्या चर्चा आणि अनाधिकृत बांधकामांना पायबंद घालू न शकल्यामुळे त्यांची "अ" प्रभाग सहाय्यक आयुक्त पदावरून उचल बागंडी झाल्याच्या खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगल्या होत्या.
दोन दिवसापूर्वीच अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्विकारलेल्या प्रमोद पाटील यांनी कल्याण डोंबिवली आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अनिबांधकाम नियंत्रण विभागाचे उप आयुक्त अवधूत तावडे यांच्या निर्देशानुसार अँक्शन प्लान तयार करून तीन दिवसीय अनाधिकृत बांधकाम पाडकाम मोहीम सुरू केली आहे.
"अ" प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी माहिती दिली की, बुधवार 5 फेब्रुवारी ते 7फेब्रुवारी या तीन दिवसीय अनाधिकृत बांधकाम तोडक कारवाई मोहीम सुरू केली असून यामध्ये अनाधिकृत नळजोडणी खंडित करणार असून ही अनाधिकृत बांधकामावर धडक तोडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे सांगितले."
अनाधिकृत बांधकाम तोडक मोहीमेच्या बडग्यामुळे चाळ माफिया भूमाफियांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत होते. परंतु हा कारवाई चा बडगा किती दिवस की, नुसताच फार्स अशा ही चर्चा यानिमित्ताने रंगल्या होत्या. बल्याणी येथे बुधवारी सकाळी सुरू झालेल्या अनाधिकृत चाळीच्या पाडकाम कारवाईत अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे पोलिस कर्मचारी अनाधिकृत बांधकाम विभाग अ प्रभाग कर्मचारी 1 जेसीबी,1 डंपर असा फौजफाटा होता.
Post a Comment
0 Comments