ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
अंबरनाथ नगरपालिकेचे मा. प्रशासक श्री प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालय विभागा अंतर्गत शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र येथे ज्येष्ठ संपादक आणि लेखक श्री कुमार केतकर यांच्या सदिच्छा भेटीचे नियोजन आज करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रेरणा ग्रंथालयांच्या ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात केली. श्री कुमार केतकर यांनी सदिच्छा भेटीच्या निमित्ताने शिव प्रेरणा ग्रंथालयाला 500 पुस्तकांची भेट दिली. सदर भेट अंबरनाथ नगर पालिकेचे मा.मुख्याधिकारी श्री अभिषेक पराडकर यांच्या हस्ते स्वीकारली. श्री कुमार केतकर यांचे स्नेही आणि ग्रंथालय चळवळीतले कार्यकर्ते श्री विनायक गोखले यांनी काही आठवणी सांगून व प्रश्न विचारून कुमार केतकर यांना विचारून या गप्पांची मैफिल रंगवली .या कार्यक्रमाला अंबरनाथ नगरपरिषदेचे सर्व अधिकारी तसेच शहरातील लेखक व मान्यवर नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments