ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणातअसलेले असलेले श्री गोरखनाथ मंदिरात गोरक्षनाथ माऊली भजनी मंडळ अखंड हरिनाम सप्ताह व नवनाथ ग्रंथ पारायण हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता.3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत चार दिवस चालणारा हा सप्ताह आणि माघ महिन्याचा महागणपती उत्सव हा दुग्ध शर्करा योग जुळून आला.सकाळी आठ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत अनेक सुप्रसिद्ध ह भ प महाराज यांनी आपली सेवा प्रदान केली.
6 फेब्रुवारीला सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत ह भ प श्री संदीप महाराज डुंबरे (राजुरी-जुन्नर ) यांचे काल्याचे सुश्राय किर्तन होणार असून नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.
Post a Comment
0 Comments