Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बेलगामांना लगाम घालण्याचे काम यापुढे करायचे आहे- सुभाष बसवेकर!

 

           ब्लॅक अँड व्हाईट झिडके-अंबाडी वार्ताहर

 " माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य " ठाणे जिल्ह्याचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर शनिवार दिनांक‐8/2/2025 रोजी " धर्मवीर आनंद दिघे " हाॅल शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते,यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून  " माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे" संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर उपस्थित होते,त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात म्हटले की,शासन-प्रशासनामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती असून,आज जनतेच्या दृष्टीने हित न पाहता सद्यस्थितीत लोकशाही धोक्यात आहे,अशा वेळेस माहिती अधिकार कार्यकर्त्यांने निर्भीडपणे तसेच माहिती अधिकार कायद्याचा अभ्यास करून,जनतेला न्याय देण्यासाठी शासन-प्रशासनातील चालकांना "बेलगामांना,लगाम" घालण्याचे काम यापुढे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी करायचे आहे,अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे सदैव असेन अशा प्रकारे स्पष्ट व प्रखर मत आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त  केले.

     " माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ" सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे कार्यरत असून,यापैकी ठाणे जिल्ह्यात उत्तम रित्या काम पाहून मला येथील कार्यकर्त्यांचा अभिमान आहे.येथील कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करावे,काही अडचण निर्माण झाल्यास मला केव्हाही संपर्क करा,असेही यावेळेस सांगण्यात आले.

     हे मार्गदर्शन शिबीर जिल्हाध्यक्ष शंकर वडवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले,यावेळेस सभा मंचकावर जिल्हा महासंघाचे पदाधिकारी अशोक पडवळ,संतोष घुडे,संतोष राऊत,तसेच ठाणे शहर जिल्हाध्यक्ष दयानंद उल्मिक,मुंबई शहर जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,तालुकाध्यक्ष शांताराम पाटील,दिलीप पवार,महिला आघाडी अध्यक्षा माया मगर आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

     या मार्गदर्शन शिबीरात उपस्थित कार्यकर्त्यांपैकी दिनेश दाभणे,विजय गायकवाड,दिलीप पवार,माया मगर,संतोष राऊत,संतोष घुडे,अशोक पडवळ,दयानंद उल्मिक,विजय शेलवले आणि ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शंकर वडवले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

     या शिबिराच्या प्रसंगी " माहिती अधिकार महासंघ " संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नवनियुक्त पदाधिकारी शंकर वडवले,कोकण प्रदेश कार्याध्यक्ष,अशोक पडवळ,ठाणे-पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदि पदाधिकारी नियुक्तीबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांसमोर जाहिर केले.तर महासंघात नव्याने काम करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना नियुक्तीबद्दल पत्र देऊन अभिनंदन केले.सदर मार्गदर्शन शिबिराचे प्रस्ताविक,सूत्रसंचालन व आभार देविदास जाधव शहापूर तालुकाध्यक्ष यांनी केले.अशा प्रकारे अत्यंत उत्स्फूर्तपणे शिबीराची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments