Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गँग्स ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात

 

मनसे नेते, माजी आमदार.राजू पाटील यांची सडकून टिका

रहिवाशांना न्यायालयीन लढा लढण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गँग्स ऑफ डोंबिवलीचा म्होरक्या ठाण्यात राहत असल्याची टिका मनसेचे माजी आमदार तथा नेते राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांवर नाव न घेता केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 65 इमारती आणि  दिवा येथील इमारती याबाबत

रहिवाशांना न्यायालयीन लढा लढण्यासाठी मनसे सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगत राजू पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मनसेची भूमिका मांडली.   

यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले किअनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हे दाखल असलेले जास्त शिंदे गटात असून सेलेब्रिटी सलमान खान यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ आहे मात्र 65 इमारातींमधील नागरिकांना भेटायला वेळ नाही. गंगेत डुबकी मारून पाप धुण्यापेक्षा इथे येऊन रहिवाशांना भेटा पुण्य कमवाअनधिकृत बांधकाम करनाऱ्यांना, कागदपत्र बनवनऱ्यांना, लोकांची फसवणूक करणाऱ्यांना ठाण्यातून अभय मिळत आहे.

इथले पालकमंत्री आहात, नगरविकासमंत्री आहात, तुमचा मुलगा इथला खासदार आहे.  विधानसभा निवडणुकीत संबंधित बिल्डरला इमारत तोडण्याची धमकी देत काम करायला लावले. अनधिकृत बांधकाम करणारी साखळी जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही. काही लोक हस्तक दिसायला फक्त आमदार असल्याची टिका आमदार राजेश मोरे यांच्यावर केली.    

तर रहिवाशांच्या पाठीशी मनसे उभी असून त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी लागणारी आर्थिक मदत करू  मात्र यांना दिलासा कसा देणार असा सवाल राजू पाटील यांनी केला. या प्रकरणी मंत्री गणेश नाईक यांना भेटणारअसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे पाटील यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments