प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने रविवारी ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले.
देश-विदेशात राबविण्यात आलेल्या या प्रोजेक्ट अमृत जलस्रोतांच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत ठाणे व डोंबिवली क्षेत्रामध्ये सिद्धेश्वर तलाव, हंस नगर, ठाणे (पश्चिम); रायलादेवी तलाव, वागळे इस्टेट, ठाणे, ओवळा निरंकारी भवन जवळील तलाव तसेच डोंबिवली परिक्षेत्रामध्ये गावदेवी मंदिर सार्वजनिक तलाव, डोंबिवली; गणेश तलाव, डोंबिवली (पूर्व); गणपती विसर्जन तलाव, ठाकुर्ली (पूर्व); गौरीपाडा तलाव, कल्याण (पश्चिम); नांदिवली कोळीवाडा तलाव, कल्याण (पूर्व); आडीवली ढोकाळी तलाव, कल्याण (पूर्व); उल्हास नदी, पांजरापोळ, भिसोल; माऊली तलाव, निळजे गांव; उल्हास नदी, बदलापुर (पश्चिम); टेमघर व देवजी नगर येथील तलाव, भिवंडी; खदान तलाव, अंबरनाथ (पश्चिम); बुरदुल गाव तलाव; गणेश विसर्जन घाट व भातसा नदी, वाशिंद; गंगा देवस्थान, शहापुर आणि व्यंकटेश्वर मंदिर उल्हास नदी, आंबिवली (पूर्व) इत्यादि ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या व्यतिरिक्त मुंबई शहर व उपनगरातील कित्येक तलाव व समुद्र तटीय बिच, नवी मुंबईतील अनेक तलाव व मिनी सी शोअर; उरणचे तलाव व बीच, भाईंदरची उत्तन चौपाटी; वालीव(वसई) येथील तलाव, नालासोपारा येथील कळंब बिच आणि विरार येथील अर्नाळा बिच आदि अनेक ठिकाणी हे व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाच्या दरम्यान अनेक मान्यवर व्यक्तींनी जागोजागी सदिच्छा भेट दिली आणि स्वच्छता अभियानाचे अवलोकन करण्याबरोबरच मिशनच्या मानवतेच्या प्रति केल्या जाणाऱ्या कार्यांची प्रशंसा केली. या मान्यवरांमध्ये राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गिरगांव चौपाटी येथे, राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे, आमदार संजय केळकर व आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी ठाणे येथील सिद्धेश्वर तलाव येथे तर बदलापुर येथे आमदार किसन कथोरे आदिंनी उपस्थित राहून सेवादार भक्तगणांचा उत्साह वाढविला. या व्यतिरिक्त अनेक समाजसेवी सज्जन व महापालिका अधिकाऱ्यांनीही या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला.
Post a Comment
0 Comments