ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मनपाच्या डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग क्षेत्रातील बिगर निवासी मालमत्तांना वारंवार भेटी व नोटीस देवूनसुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत, कर अधिक्षक बाबू पाटील, वरिष्ठ लिपीक नंदकिशोर राणे, संतोष आहेर लिपिक शुभम भारती, कुणाल बसवत, भीम म्हात्रे, शिपाई दीपक म्हात्रे यांच्या पथकाने थकबाकी पोटी बिगर निवासी मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई नुकतीच केली आहे.
या धडक कारवाईत वसंत हेरिटेज बिल्डिंग, महात्मा फुले रोड, गरिबाचा वाडा डोंबिवली पश्चिम येथील 5 दुकाने 2 लाख 38 हजार 672रू.मालमत्ता कर थकबाकी पोटी सील करण्यात आली. प्रशासनाच्या मालमत्ता कर थकबाकी पोटी सील करण्याच्या धडक कारवाई बडग्यामुळे मालमत्ता कर थकबाकीदाराचे धाबे दणाणले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत होते.
Post a Comment
0 Comments