ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण मध्ये पूर्व आणि पश्चिम मध्ये क्रिकेट प्रेमींसाठी आणि खेळप्रेमीसाठी अनेक टर्फ निर्माण झाले आहेत.त्या सर्वांपेक्षा भव्य अशा टर्फचे निर्माण झाले आहे.आपल्या क्रिकेट खेळाडू टीम मधील आपला कॅप्टन रोहित शर्मा याला हिट मॅन म्हणून ओळखले जाते त्या प्रेरणेतून ह्या टर्फचे नाव हिट मॅन टर्फ असे ठेवले आहे.येथे प्रत्येक वयोगटातील लोकांना सहभाग घेता येईल,लहानांपासून ते मोठ्यांना सुध्दा येथे आपापल्या खेळाचा आनंद घेता येईल. असं हे टर्फ निर्माण करणारे,श्री साई अय्यर,आनंद तिवारी,विहंग वरवटे यांनी सांगितले.
ह्या टर्फच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी.नगरसेवक,सुनील वायले,अर्जुन भोईर,अनिल पंडित,सौ कस्तुरी देसाई,प्रताप तुमकर,श्रेयस समेळ,श्री. जतीन प्रजापती,श्री.उल्हास भोईर,ह्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.सर्वांनी ह्या शुभारंभ प्रसंगी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ह्या आनंदाच्या क्षणी हिटमॅन टर्फचे निर्माते यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहून एक कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्याचा आनंद घेतला.
Post a Comment
0 Comments