सफाई कामगार हिराबाईचा वाढदिवस साजरा करून दिला माणुसकीचा धडा
ब्लॅक अँड व्हाईट मुरबाड -प्रतिनिधी(दिलीप पवार)
"जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे" या उक्ती प्रमाणे काही माणसे आजही अगदी देवा प्रमाणे धाऊन येत असतात याचा प्रत्यय अनेक वेळा दिसून आला आहे. असाच एक प्रसंग मुरबाड पोलीस स्टेशन मध्ये घडला आहे.मुरबाड शहरात एक सर्वांनाच सुपरिचित असलेली व्यक्ती म्हणजे हिराबाई. या हिराबाईला जवळचे असे कोणीच नाही.पोटाची खळगी भरण्यासाठी रोज सकाळी उठून मुरबाडला यायची, पण इथे येऊनही तिला कामधंदा कोण देणार हा प्रश्न होता. हळूहळू ती मुरबाड पोलीस स्टेशनच्या संपर्कात आली. त्यावेळी मुरबाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते प्रसाद पांढरे साहेब यांनी तिच्यावर दया दाखवत तिला पोलीस स्टेशन मध्ये साफ सफाई चे काम दिले.आणि त्या दिवसापासून हिराबाई पोलीस स्टेशनची साफ सफाई इमाने इतबारे करू लागली. दुसरीकडे हिराबाई हळूहळू सगळ्यांची मने जिंकू लागली व आवडती झाली. आजही ती संपूर्ण बाजारात व तालुक्यात" चिमणी बाई "या टोपन नावाने म्हणून सुपरिचित आहे.
अशाच या हिराबाईचा सोमवारी वाढदिवस होता. वाढदिवस आहे म्हणून हिराबाई आठवडा भर अगोदरच आनंदीत झाली होती. याची कुणकुण आताच नव्याने रूजू झालेले पोलिस निरीक्षक संदीप गिते यांना लागली. गिते साहेबांनी हिराबाईचा आयुष्यात कधीही साजरा न झालेला वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्याचे ठरवले व तशा सुचना त्यांनी आपल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या व आज दुपारी मुरबाड पोलीस स्टेशन मध्ये हिरा बाईचा वाढदिवस सर्व पोलीस कर्मचार्यांच्या सोबत केक कापून व केक भरवत जल्लोषात साजरा करण्यात आला. तर यावेळी रिपाईचे तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी सर्वांसाठी फळे आणली व ती फळे हिराबाईने तिच्या हस्ते वाटून तिचा आनंद द्विगुणित केला .यावेळी हिराबाईच्या या निमित्ताने रिपाईचे उपाध्यक्ष रमेश देसले, पत्रकार दिलीप पवार व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून तिला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments