Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संशोधक अभ्यासक सुनील म्हसकर यांच्या शोधनिबंधाचे राष्ट्रीय चर्चासत्रात उत्तम सादरीकरण...

 

  संशोधक अभ्यासक सुनील म्हसकर यांनी 'भारतीय ज्ञान प्रणालीबाबत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांमध्ये असलेल्या जागरूकतेचा अभ्यास' या विषयावर आपला शोध निबंध (रिसर्च पेपर) पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उत्तम प्रकारे सादर केला.

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

शनिवार, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, कल्याण येथे 'भारतीय ज्ञान प्रणाली' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र अतिशय नियोजनबद्ध व देखण्या स्वरूपात संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, कल्याण आणि कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात संशोधक अभ्यासक सुनील म्हसकर यांनी 'भारतीय ज्ञान प्रणालीबाबत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांमध्ये असलेल्या जागरूकतेचा अभ्यास' या विषयावर आपला शोध निबंध (रिसर्च पेपर) पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उत्तम प्रकारे सादर केला.  या रिसर्च पेपरसाठी सुनील म्हसकर यांना मार्गदर्शक प्रा.डॉ.हिना वाधवानी आणि डॉ.भक्ती सिंघानिया, डॉ.सुनीता मगरे यांनी मार्गदर्शन केले. 

संशोधक अभ्यासक सुनील म्हसकर हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या उल्हासनगर येथील सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालय या केंद्रातून डॉ.हिना वाधवानी यांच्या मार्गदर्शनाखाली 'शिक्षणशास्त्र' या विषयात पीएचडी करत आहेत. 

सुनील म्हसकर यांनी  या आधी “इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वयं-निर्देशित अध्ययन  शैलीचा अभ्यास...”  या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर तर  “महिला शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास” हा  राष्ट्रीय पातळीवर असे शोधनिबंध उत्तम प्रकारे सादर केले आहेत. तसेच त्यांनी आजतागायत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा, व वेबिनार यामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे.संशोधक अभ्यासक सुनील म्हसकर यांनी  संशोधन कार्यातील केलेल्या या कौतुकास्पद व अभिमानास्पद कामगिरीबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

सदर राष्ट्रीय चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. सुनीता मगरे, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे डीन तथा स्कूल ऑफ एज्युकेशन विभाग प्रमुख डॉक्टर गोपाळ ठाकुर, शिक्षणाधिकारी तथा प्राचार्या डॉ. वैशाली वीर, प्राचार्य विठ्ठलराव कांबळे, असोसिएट डीन डॉ. सी.ए.चक्रदेव, सेवासदन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर संजय निंबाळकर यांनी मार्गदर्शन  केले. तर याप्रसंगी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक डी. बी. वीर, कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे  झाकी काजी व डॅनियल काजी, ज्येष्ठ विचारवंत जोशी बाबा, प्राचार्या डॉ.विद्युलता कोल्हे, प्राचार्य रवींद्र विलकु, प्राचार्य रितू सिंग, प्राचार्य निमा खती, डॉ.अंजली किरकिंडे प्रो.हिना खान, डॉ.नीलिमा किनगे, संशोधक अभ्यासक सचिन पाटील, अर्चना भालेवार आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व संशोधन अभ्यासक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments