ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली ( शंकर जाधव )
डिसेंबर महिन्यात पुणे पार पडलेल्या नॅशनल रॉ चॅम्पीयनशीत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन केले.यातील महाराष्ट्रातून 37 खेळाडूंची निवड ऑपन एशिया पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत निवड झाली असून यात डोंबिवलीतील पॉवरहाऊस जिमचे समीर जोगळेकर यांची मास्टर- २ गटात, विजय हडगे यांची सब ज्युनियर गटात निवड झाली तसेच मुंबईचे मास्टर महिला गटात प्रतिभा तावडे, वृंदा राणे, निता नावर, अर्चना गोलकर, सरीता कदम, रामदिन नंदकिशोर व सब ज्युनियर व ज्युनियर गटात परी अहिर व मानसी अहिर यांची निवड झाली.
तसेच मास्टर पुरुष गटामध्ये पार्लेचे जितेंद्र अहिर व संभाजी अंकर्लेकर व शंकर ठाकूर व साताऱ्याचे प्रमोद पाटील व स्मिता पाटील, दर्शन देशमुख व सिनियर महिला गटात दया हदीया व धुळयाची कुलश्री कोळी व सोनम कतरी हया सर्वांची निवड युपीएफआयचे महाराष्ट्राचे पदाधिकारी सचिन तापडे यांनी केली.
यूनायटेड पॉवर लिफ्टिंग फेडरेशनचे पदाधिकारी धर्मेश पटेल, अल्ताफ शेख व सचिन तापडे यांनी केली. हि स्पर्धा २१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरत, गुजरात येथे खेळविण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments