ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली नाक्याजवळ श्री समर्थ बंजारा मित्र मंडळ तर्फे संत श्री सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. श्री समर्थ बंजारा मित्र मंडळच्या स्थापित केलेल्या संत श्री सेवालाल महाराज्यांच्या प्रतिमेचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजू चव्हाण, शंकर राठोड, रवि जाधव, किशन चव्हाण, जग्गू चव्हाण, कमलेश चव्हाण, मनोज जाधव यासह अनेकजण उपस्थित होते.
यावेळी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान बंजारा समाजाचे गायक सुभाष राठोड यांनीही संत सेवालाल यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी गायक राठोड म्हणाले, डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली नाक्याजवळ अनेक वर्षापासून सेवालाल जयंती उत्सव साजरा होत आहे. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जयंती निमित्त भजन, कीर्तन असे कार्यक्रम करत असून समाजाचे लोकं त्यांना साथ देत आहेत. सर्वांना संत श्री सेवालाल जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments