Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पॅरंटाईन डे'च्या माध्यमातून पालकांविषयी प्रेम आणि कृतज्ञतेची भावनिक अभिव्यक्ती

 


                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारी हा 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जात असताना, एसएसटी महाविद्यालयाने मात्र या दिवशी आपली मागील अनेक वर्षांपासून सुरू केलेली अनोखी परंपरा जोपासत 'पॅरंटाईन डे' साजरा केला. 

आपल्या पालकांविषयी असलेल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच भारतीय संस्कृतीतील पारंपरिक मूल्ये रुजवली जावीत, या उद्देशाने महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.



यंदाही हा दिवस महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात अनेक पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उपस्थितीत पार पडला. या विशेष सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त अजय साबळे, एसएसटी महाविद्यालयाचे चेअरमन आणि संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. जीवन विचारे, तसेच उपप्राचार्य डॉ. दीपक गवादे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची औक्षण करून पूजा केली, त्यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त केली, तसेच आपल्या चुका मान्य करत त्यांची माफीही मागितली. या सोहळ्यात डोळ्यांत आनंदाश्रू आणणाऱ्या अनेक हृदयस्पर्शी क्षणांची अनुभूती सर्वांनी घेतली.



ड्रामानॉमिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्याचा आणि पालकांना प्रेमाने आपल्यासोबत ठेवण्याचा संदेश दिला, तर डान्स मॅनिया गटाने सादर केलेल्या डोंबारी लोकनृत्य आणि गणेश वंदनेने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.

भावनिक झालेल्या पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलचा आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना पालकांविषयी कायम आदर आणि प्रेम बाळगण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे एनएसएस युनिट, डीएलएलइ युनिट, 'संजीवनी' सांस्कृतिक समिती आणि विविध विभागांचे प्राध्यापक आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments