ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभागक्षेत्रात अनाधिकृत बांधकाम प्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये 5 जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने भुमाफिया, चाळ माफियांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वी अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी प्रमोद पाटील यांची वर्णी लागली. प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग क्षेत्रातील, टिटवाळा, मांडा, गणेश नगर, इंदिरा नगर, बल्याणी, उभंर्णी, मोहेली, गाळेगाव, मोहने, वडवली, अटाळी, आंबिवली, बंदरपाडा, शहाड परिसरातील पेव फुटलेल्या अनाधिकृत बांधकामाच्या तक्रीरी, रडारवर आलेली अनाधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याचा धडका सुरू करीत सुमारे 850 अनाधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली. यामुळे अनाधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया,चाळ माफिया यांनी धडक पाडकाम कारवाई चा चांगलाच धसका घेतला असल्याचे समजते.
यावर न थांबता त्यांनी मंगळवार अधिक्षक शिरीष गर्गे यांनी कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी फिर्याद देत मांडा येथील स.नं. १७८, ता. कल्याण, जि. ठाणे येथे जोते स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बल्याणी येथील पाण्याच्याटाकी समोर, आदिवासी पाडा लगत, बल्याणी, ता. कल्याण, जि. ठाणे येथे 5 दुकान गाळे अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी संबंधित बांधकामधारक किताबुल्ला शेख, बैतुल्ला शेख यांच्या विरूद्ध एमआरटीपी अंतर्गत टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर मांडा येथील स.नं. १७८, ता. कल्याण, जि. ठाणे येथे जोते स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम केल्या बद्दल संबंधित बांधकामधारक मुखलीस काबाडी, इफतीकार काबाडी, जुल्फेकार काबाडी व इतर यांना सदर बांधकामाची अधिकृतता सिद्ध करणारे कागदपत्र सादर करण्यांकामी प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी सुनावणी ठेवून देखील कागदपत्रे सादर न केल्याने त्यांच्यावर एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments