कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची स्फूर्ती फाऊंडेशनची मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिकची जीवघेणी कोंडी होत असून रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नागरीकांची झाली आहे. त्यामुळे कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडविण्याची मागणी स्फूर्ती फाऊंडेशनने केली आहे. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिसांना निवेदन दिले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटीची अनेक स्वप्न दाखवत आहे परंतु अजूनही रस्ते, खड्डे आणि ट्रॅफिक अशा मुलभूत सुविधांसाठी नागरीक ओरड करत आहेत. नोकरदार रेल्वे प्रवास करून आल्यानंतर घरी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनवरून रोज अर्धा तास तर कधी कधी एक तास लागतो. कल्याण -मुरबाड रोड, कल्याण श्रीदेवी हॉस्पिटल, बैल बाजार रोड, कल्याण पुष्पराज हॉटेल रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी किल्ला रोड नियमित ट्रॅफिक असते.
अनेक नागरीकांनी कल्याण - बाईचा पुतळा मुरबाडरोड ट्रॅफिक बाबत तक्रार केली होती. त्या अनुषंगाने स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर, महिला प्रमुख शिल्पा तांगडकर व जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांच्या वतीने वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सॅटिस प्रकल्प काम कधी पूर्ण होणार हा नागरीकांचा प्रश्न आहे. जेणेकरून ट्रॅफिक मुळे नागरीकांचा गुदमरलेला जिवास श्वास घ्यायला मिळेल. वाहतूक पोलीसांची संख्या वाढवावी, बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अवजड वाहने सकाळी व संध्याकाळी पूर्णतः बंद असावी, सिग्नल यंत्रणा नियमित चालू असावी अशी मागणी केली आहे.
Post a Comment
0 Comments