रस्त्यांच्या आधी युटीलीटी सर्विस पूर्णकरून चांगल्या दर्जाचे रस्ते बनविण्याची केली मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील ड वॉर्ड विभगात अनेक डिपी रस्ते युटिलिटी अभावी बनत असून, पोहच रस्ते आपुऱ्या अवस्थेत आहेत. तर गरजेचे अंतर्गत रस्ते अतिक्रमण होऊन नागरिकांची बोंबाबोंब आहे. या सर्व रस्ते विषयांवर कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, माजी नगरसेवक मनोज राय, नवीन गवळी, अभिमन्यु गायकवाड, प्रमोद पिंगळे, नगरसेविका माधुरी काळे, राजवंती मढवी, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आदींनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता परदेशी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी कल्याण पूर्वेतील डीपी रोडसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली.
कल्याण पूर्व उप अभियंता गोसावी यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्नांचा भडिमार करून दिरंगाई कामांचा ठपका ठेवत त्यांना अनेक प्रश्नांचा भडीमार केला. पुणे लिंक रोड ते सम्राट हायस्कूल समोरून 100 फुटी रस्त्याला जोडणारा रस्ता कल्याणच्या विकासाच्या दृष्टीने अनेक रस्त्यांमधील एक रस्ता आहे. गेली अनेक वर्ष हा रस्ता होऊ शकला नाही. याबाबत शहर अभियंता आणि कल्याण पूर्वेतील उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. रस्ता बनत असताना युटिलिटी अस्तित्वात नसल्याचे दिसून आलं. संबंधित विभागाकडून अतिक्रमण हटवून रस्ता करण्यात येईल असे आश्वासन यावेळी शहर अभियंता यांच्याकडून देण्यात आले.
कल्याण पूर्वेच्या खुंटलेल्या विकासाबाबत पालिका अधिकाऱ्यांवर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रस्तावित रोड तात्काळ होण्याचे निर्देश महानगरपालिका शहर अभियंता यांना दिले. माधुरी प्रशांत काळे यांच्या प्रभागातून जाणाऱ्या हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा या साठी शासनाकडून या कामासाठी मोठा निधी उपलब्ध होत असल्याचे शिवसेना विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी यावेळेस सांगितले. होणारे रस्ते हे अपुऱ्या नागरी सुविधांचे आहेत, त्यामध्ये पुढे हे रस्ते सिमेंट काँक्रीट झाल्यानंतर पुन्हा त्यांना खोदण्याची वेळ येऊ नये यासाठी नगरसेवक मनोज राय यांनी विषय मांडला.
Post a Comment
0 Comments