Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

संविधान गौरव अभियान संदर्भात भाजपा कार्यालयात बैठक संपन्न

  

संविधान गौरव

अभियानास मिळतोय उदंड प्रतिसाद !


संविधान गौरव अभियान

संदर्भात भाजपा कार्यालयात बैठक

संपन्न

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

भारतीय जनता पार्टीचे संविधान गौरव अभियान पूर्ण देशभर चालू असून राज्यभर या संविधान गौरव अभियानास उदंड प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी हीच संविधानाची खरी सन्मान करणारी पार्टी आहे. हेही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस व संविधान गौरव अभियानाचे राज्याचे सहसंयोजक शशिकांत कांबळे यांनी दिली.

संविधान गौरव अभियान संदर्भात सोमवारी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यालयामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री भाई गिरकर तसेच राज्याच्या सरचिटणीस माधवी नाईक यांनी या बैठकीला मार्गदर्शन केलेयावेळी शशिकांत कांबळे बोलत होते. या बैठकीला माधवी नाईक, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री भाई गिरकर, धम्मपाल मेश्राम, शशिकांत कांबळे, पंडित सूर्यवंशी, दिनेश पगारे, डॉक्टर मिलिंद माने, तेजस निर्भवणे, धनराज बिर्दा, सुरेश गायकवाड, अशोक उमर्गेकर यासह अन्य महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते  

या अभियानाचे संयोजक राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आहेत. महाराष्ट्र मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्यभर संविधान गौरव अभियान चालू आहे. राज्याचे संयोजक आमदार अमित गोरखे आहेत.  पूर्ण राज्यभर संविधान गौरव अभियानाचे कार्यक्रम राबविले जात असून हे अभियान 26 तारखेपर्यंत राबवायचे आहे.  

सर्व जिल्ह्यांमध्ये एक जाहीर सभा तसेच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये संविधानाच्या विषयात अभियान राबवली जात असून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय नेत्यांच्या सुद्धा संविधान गौरव अभियानाचे विषयात सभा आयोजित केलेले आहेत. 16 तारखेला ज्योतिरादित्य शिंदे यांची पुणे येथे सभा झाली असून महाराष्ट्र मध्ये अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, लालसिंग आर्या अशा अनेक मान्यवरांच्या सभा या महाराष्ट्र प्रदेशामध्ये होणार आहेत.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा नेहमीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीअमित शहा तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सन्मान केलेला आहे.  काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभेत जाण्यापासून रोखले त्यांना निवडणुकीत पराभूत केले हे सर्व जनतेला माहित असल्याचे शशिकांत कांबळे यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments