Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बेपत्ता शुभमच्या शोधमोहिमेत पोलिसांना सहकार्याचे आवाहन


             ब्लॅक अँड व्हाईट (उल्हासनगर) प्रफुल केदारे 

गेल्या अनेक महिन्यांपासून उल्हासनगरातुन बेपत्ता असलेल्या १६ वर्षीय शुभम या मुलाच्या शोधासाठी उल्हासनगर पोलिसांनी शोध मोहीम गतीशिल केली आहे. या शोध मोहिमेत उल्हासनगर व आसपासच्या उपनगरातील नागरिकांनी या बालकास शोधण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उल्हासनगर  पोलिसांनी केले आहे.
शहरातील कॅम्प नं.२ मधील रहिवासी असणाऱ्या  १६ वर्षीय शुभमसिंग अर्जुनसिंग यादव याला २० मे २०२४ रोजी दुपारी ४,  आ सुमारास एका अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेले होते. यावेळी शुभमने गुलाबी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. तो मध्यम बांधा, ५ फूट ३ इंच उंच आणि गडद रंगाचा आहे. हा बालक बेपत्ता झाल्यापासून त्यांच्या कुटुंबात व परिसरात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे .
 गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. शुभम बाबत नागरिकांना कुठे ही, कोणत्याही प्रकारची व कधीही काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ उल्हासनगर व नजिकच्या पोलिसांशी ०२५१/२७१०००५
पोलिस उप निरीक्षक दिपक यादव यांना ९६८९८९०२६१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन  केले आहे. माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देण्याची घोषणा उल्हासनगर पोलिसांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments