1123 ग्राम गांजा केला हस्तगत
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
वाढत्या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी कल्याणमध्ये परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नशेखोरांविरोधात कारवाई तीव्र केली असतांनाच अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या देखील मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. अशातच गांजा विक्री करणाऱ्या एका इसमास खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 1123 ग्राम गांजा हस्तगत केला आहे.
कल्याण मधील शहाड नजीक बंदर पाडा येथे कृष्णा किराणा स्टोअर जवळ एक इसम गांजा हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने खडकपाडा पोलिसांनी या ठिकाणी जाऊन माहितीची पडताळणी केली. मिळाली बातमीची खात्री झाल्याने पोलीस निरीक्षक एलडी साबळे यांच्यासह या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली. गांजा विक्री करणाऱ्या इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्मण बाबू रेडी वय 40 वर्ष असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तो विक्री करत असलेला 1123 ग्रॅम वाजनाचा गांजा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तसेच याबाबत एनडीपीएस कलम 8,20(B) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलिस निरीक्षक शिवले, सपोनि विजय गायकवाड, पोउपनि व्ही आर भालेराव यांच्या पथकाने केली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments