Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

चोरीला गेलेला 1 कोटी 43 लाखांचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी केला परत

 

चोरीला गेलेला 1 कोटी 43 लाखांचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी केला परत

             ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून २ ते ८ जानेवारी दरम्यान ठाणे शहर पोलीस  अंतर्गत परिमंडळ-३ कल्याण मधील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये “पोलीस रेझिंग डे” साजरा करण्यात येत आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज कल्याणमध्ये साई नंदन हॉल याठिकाणी “मुद्देमाल माल हस्तांतरण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १६२ फिर्यादींचा चोरी झालेला तब्बल 1 कोटी 43 लाखांचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी त्यांना परत दिला. यावेळी पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. 




परत केलेल्या मुद्देमालात  38 किमंती मुद्देमाल, 30 वाहने, 91 मोबाईल, 64 लाख 95 हजार 810 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 49 लाख 71 हजार किमतीचे वाहने, 15 लाख 93 हजार किमतीचे मोबाईल, 12 लाख 78 हजार रोख रक्कम असाएकूण 1 कोटी 43 लाख 37 हजार 810 किमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला आहे. आपल्या हरवलेल्या वस्तू, पैसे आदी मुद्देमाल परत मिळाल्याचा मोठा आनंद या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता.

येत्या काळात महिला अत्याचार, मुलांवरील, ड्रग्ज आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील. यासोबतच ज्येष्ठ नागरिक आणि इतर वर्गासोबत वाढत चाललेल्या डिजिटल अरेस्टचे गुन्हे रोखण्यासाठीही उपाय योजना करणार असल्याची माहिती डॉ. सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी यावेळी दिली.


Post a Comment

0 Comments