ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रफुल केदारे
पोलीस विभागात सातत्याने ४० वर्ष निष्कलंकित सेवा करणे, सर्वाधिक फरार गुन्हेगार शोधून गजाआड करणे, अनेक गुन्ह्यांची उकल करण्याची कामगिरी करणे यामुळे उदयकुमार पालांडे हे पोलिस दलाची शान होते. त्यांच्या ज्ञान व अनुभवाचा पोलिस विभागास खुप फायदा झाला आहे. त्यांची सेवा निवृत्ती म्हणजे पोलिस दलाच्या तिजोरीतुन कोहिनूर हिराच हरवणे होय. असे गौरवोद्गार सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी काढले. ते ठाणे शहर आयुक्तालयात पोलीस उपनिरीक्षक उदयकुमार पालांडे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी त्यांचा गौरव करतांना बोलत होते.
गुन्हेगारीला आळा घालायचा, फरार गुन्हेगारांना हुडकून काढायचं. त्यासाठी दिवस रात्र एक करणे, कायम आपल्या कर्तव्याशी ईमान राखत उदयकुमार पालांडे यांनी निस्वार्थ सेवा केलीय. ४ जानेवारी ८५ ला कोळसेवाडी पोलिस ठाण्यात उदय पालांडेंची पोलिस कारकिर्दी तली पहिली नेमणूक झाली. त्यांची कार्यपद्धती बघून वरिष्ठांनी त्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करण्याची संधी दिली. आरोपींना हुडकून काढायचं पोलिसांचं आपलं तंत्र असतंच, पण उदय पालांडे यांनी आपल्या स्वतःच विकसित केलेल्या कौशल्याच्या जोरावर परिणामकारक तंत्र आत्मसात केलंय. ठाणे जिल्ह्या तील कोळसेवाडी पोलिस ठाण्यातून उदय पालांडे उदय झाला. गेल्या ४० वर्षांच्या कालावधीत ४८० आरोपी हुडकून काढल्याची नोंद उदय पालांडे यांच्या नावावर आहे. त्यात खून, चोरी, घरफोडी, फसवणूक, बलात्कार आणि जुगारा सारख्या गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे.
वरिष्ठांकडून १०३१ बक्षिसं, ५५ प्रशस्तीपत्रक, १८ कौतुकास्पद पत्रं, ३० समाजभूषण, पोलिस महा संचालकांचं सन्मानचिन्ह आणि गौरवास्पद असं राष्ट्रपती पदक देऊन पोलिस दलाकडून, शासनाने, समाजाने उदय पालांडेंच्या प्रामाणिक सेवेची दखल घेतलीय. ठाणे पोलिस आयुक्तालयातील ३५ ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचं उदय पालांडेनी प्रशिक्षण केलंय. ऑनलाईन वेबिनार द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांना संबोधित करण्याची संधीही त्यांना मिळालीय.
पोलिस हवालदार ते पोलिस उपनिरीक्षक हे नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर खाजगी सुरक्षा रक्षक सेवेत ते उतरणार आहेत. सेवानिवृत्तीनंतरचा पालांडेंचा आणि सुरक्षा क्षेत्राचा हा नवा उदय असणार आहे. अशी मतं ईतर सहकारी पोलिस अधिकार्यांनी व्यक्त केली.
.jpg)

Post a Comment
0 Comments