ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत एमआयडीसी फेज १ परिसरात एक इसम गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी पप्पु दशरथ राठोड, वय. २४ वर्षे, यास सापळा लावून शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडुन ९ हजार रूपये किंमतीचा ३९१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या आरोपीवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, पोलीस हवालदार राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, पोलीस नाईक कृष्णा बोराडे, पोळीस शिपाई घनश्याम ठाकुर, गणेश बडे व नाना चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. या गुन्हयाचा तपास सपोनि महेश राळेभात हे करत आहेत.
.jpg)

Post a Comment
0 Comments