अवैध खदाणींच्या विरोधात डोंगस्ते गावातील नागरिकांचा वाडा तहसीलवर बिऱ्हाड मोर्चा
ब्लॅक अँड व्हाईट वाडा वार्ताहर
वाडा तालुक्यातील डोंगस्ते गावाच्या परिसरात खदाण व्यवसायाने स्थानिकांना बेजार केले असून लोकांनी अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने तहसीलदार कार्यालयावर थेट बिऱ्हाड मोर्चा काढला. धर्मवीर विचार मंच या संघटनेच्या माध्यमातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते.
डोंगस्ते ग्रामपंचायत हद्दीत दगड दळून शहराकडे त्यांची वाहतूक करण्याचा व्यवसाय तेजीत असून मागील अनेक वर्षात या व्यवसायाने डोंगर भुईसपाट करून आपले उखळ पांढरे केले आहेत. जनतेला मात्र दिवसरात्र सुरू असलेल्या या खदाणींमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून जमिनीत छिद्र पाडून स्फोट घडवले जात असल्याने घरांना तडे जाऊन जगणे अवघड बनले आहे. मशिनींची सतत सुरू असलेली खरखर, धुळीकणांमुळे होणारे बेसुमार वायू प्रदूषण तसेच अवजड वाहनांच्या सततच्या ये-जा मुळे रस्त्यांची झालेली दुर्दशा लोकांना असह्य करीत आहे. अनेक व्यवसायिक तर अवैधरित्या हा व्यवसाय निडरपणे करीत असून महसूल विभागाला तक्रारी करूनही लोकांचा आवाज का ऐकू येतं नाही असा प्रश्न पडला आहे.डोंगस्ते ग्रामपंचायत हद्दीत पीडित लोकांनी अखेर धर्मवीर विचार मंच या संघटनेच्या माध्यमातून शुक्रवारी तहसीलदार कार्यालयाच्या समोर बिन्हाड मोर्चाचे आयोजन केले आहे.
वर्षांनुवर्षे जंगलात राहणाऱ्या आदिवासीं लोकांचे बंद करण्यात आलेले रस्ते मोकळे करावेत, सुरुंग स्फोटांनी घरांची झालेली नुकसान भरपाई मिळावी तसेच सुरुंग स्फोट कायमचे बंद करण्यात यावेत, अवजड वाहतुकीला आळा बसवावा यासह लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या सर्व खदानी तात्काळ बंद कराव्यात या मागणीसाठी आंदोलकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
"खरतर हे आंदोलन पूर्ण तालुक्याने करण्याची गरज आहे. कारण संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये एकूण ६५ ते ७० खडीमाशिने (खदाणी)आहेत, आणि अधिकृत लायसेन्स असणारी फक्त ३० ते ३२ खडी मशिन्स आहेत.
खरेतर ही बाब वाडा तालुक्यावर अन्याय करणारी आहे.ह्या बाबत तालुक्यातील सर्व लोकांनी विचार करून आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे. लोहापा केलाठण ग्रामपंचायत परिसरात बारा ते पंधरा खडी मशीन कार्यरत आहेत,परंतु त्यातील दारूगोळा लायसेन्स असलेली फक्त चार ते पाच आहेत मग ज्यांच्याकडे दारूगोळा अधिकृत वापरण्याचं लायसन्स नाही, त्यांना दारूगोळा येतो कुठून ? आणि दारूगोळा लायसेन्स ज्यांच्याकडे नसेल तर कायद्यानुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. असे असतांना ह्या अनधिकृत लोकांचा अन्याय ग्रामस्थांनी का सहन करायचा?
डाकिवली गाव हे पूर्वीपासून वाडा तालुक्यामध्ये शिक्षणासाठी अग्रेसर असताना सुशिक्षित लोकांनी हा अन्याय का सहन करायचा.?
ह्या परिसरातील लोकांनी आयुष्याची काटकसर करून मोठमोठाली घरे ,बिल्डिंग उभारलेल्या आहेत तसेच गोर गरिबांची सुद्धा घरे उभारलेली आहेत.त्यांच्या घरांना ह्या अनधिकृत पणे दारूगोळा वापरून खदाणी मध्ये मोठे आणि तीव्र स्फोट करण्यामुळे तडे जातात ,ही घरे कोसळण्याच्या स्थितीत येतात याला जबाबदार कोण?
कोणीही, कोणताही व्यवसाय करावा,परंतु त्या व्यवसायाला अधिकृत कागदपत्रे जर नसतांना रासरोज पणे बेकायदेशीर कृत्य होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे.
ह्या सर्व अनधिकृत मशीन कोणाच्या आशीर्वादाने चालतात? कोण ह्या तालुक्यांचा वाल्मीक कराड बनू पाहतो आहे. त्याचा वेळीच योग्य तो शोध घेऊन बंदोबस्त करायाला हवा. अन्यथा दुसरा बीड होऊ शकतो.
ज्या ज्या लोकांकडे दारूगोळा लायसेन्स नाही त्यांना ग्रामपंचायतने खडी मशिन चालविण्याचा परवाना देऊ नये. कारण दगडाचे ब्लास्ट करण्याचे ज्यांच्याकडे परवाना नाही त्याला दगड कारखाना चालविण्याच्या अधिकार नाही.
दारूगोळा परवाना हा ज्या जागेचा सर्व्हे नंबर आहे त्याच जागे मध्ये दगड काढू शकतो.असा शासकीय नियम आहे.याबाबत ग्रामस्थांनी माहिती घेऊन खातरजमा करून घ्यावी.
डाकिवली ग्रामपंचायत परिसरात दारूगोळा परमिशन फक्त चार ते पाच लोकांकडे आहे.त्याच लोकांनी जर खडी मशिन चालवल्या तर गावामध्ये अनधिकृतपणे येणारे १००ट्रक कमी होतील. ह्या १००ट्रक रोज कमी ज्याला तर महिन्याला ३०००ट्रक कमी होतील आणि एका वर्षात ३६००० कमी होतील ,
त्याचा परिणाम आपल्या गावाचे रस्ते चांगले राहतील, पोल्युशन,कमी होईल,लोकांचा घरांना तडे जाणार नाही,शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम होणार नाही.पुर्ण गाव प्रदूषण मुक्त होऊ शकतो."
वसंत पाटील(अप्पा)
.jpg)




Post a Comment
0 Comments