Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अमंली पदार्थ विरोधी पथकाची डॅशिंग कामगिरी

             ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात डॅशींग पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आता गनिमीकाव्याचा वापर सुरू केला आहे. आता गनिमि काव्याचा वापर करुन अमंली पदार्थ विरोधी पथकाने धक्कादायक कारवाई केली.

मॅफेड्रॉन ड्रग्ससह जाफर इराणी या इराणी काबिल्यात राहणाऱ्या कुख्यात तस्कराला कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या पश्चिमेकडील सापळा लावून चक्क उचलले. 

स्थानिक पोलिसांनी गर्द झाडे-झुडपे, खाडी किनारा आणि निर्जनस्थळी चरस, गांजा, अफू, अफिम, एमडीसह मद्यपान करणाऱ्या, तसेच काही गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अमंली पदार्थ विरोधी पथक गांधारी पुलाजवळ दबा धरून बसले होते. तासाभराच्या प्रतिक्षेनंतर जाफर इराणी हा पुलाजवळ संशयस्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पोलिस निरीक्षक ए. ए. शिवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने झडप घालून जाफर इराणीची जागीच गठडी वळली. अंगझडती दरम्यान त्याच्याकडून 10 ग्रॅम वजनाची 31 हजार रूपये किंमतीची मॅफेड्रॉन (एमडी) पावडर हस्तगत केली.

निर्जनस्थळांसह उघड्यावरील 73 गोरखधंदे उद्ध्वस्त 

कल्याण परिमंडळ - 3 मधील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मोकळी मैदाने, निर्जनस्थळे आणि फूटपाथसह रस्ते बळकावून बसलेल्या ठेले, टपऱ्या, ढाबे अशा 73 आस्थापनांवर शनिवार-रविवारच्या रात्री पोलिसांतर्फे धडक कारवाई केली. उघड्यावर, तसेच निर्जस्थळी 168 नशेखोरांसह एकूण 241 कारवाई करण्यात आल्या आहेत. धूम स्टाईलने दुचाक्या उडविणाऱ्यांसह ट्रिपल सीट चालविणाऱ्या 269 करवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत अशा प्रकारे एकूण 510 जणांवर कारवाई करण्यात आली असून कारवाईची मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments