ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
न्यायालयाची बंदी असताना देखील डोंबिवली सोनारपाडा गावात बैलांची झुंज पार पडली. बैलांची हि झुंज बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. तर सोशल मिडियावर या झुंजीचा व्हीडीओ वायरल झाल्यानंतर बैलांची झुंज लावल्याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात दोन बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल आणि कल्याणच्या सापाड गावचे बैल सहभागी झाले होते. स्पर्धेत बैलांची सुरू असलेली झुंज प्रेक्षक पाहत असताना त्यांच्यासमोर तरुणांई धिंगाणा घालताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी सुद्धा अश्या स्पर्धामध्ये दोन गटात भांडण आणि राडे झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत असा प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थिती केला जात आहे
तर या प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच मानपाडा पोलीसांनी अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावातील झुंज बैल मालक रोशन दळवी, गणेश साळवी व कल्याण मधील सापाड गावातील बारक्या मढवी व आयोजक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली.
Post a Comment
0 Comments