ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
आज रविवार, दिनांक २६ जानेवारी,२०२५ रोजी अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते राष्ट्रपिता' महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण चा कार्यक्रम मा. प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत, तसेच सन्माननीय माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, गटनेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण विभागस्तरीय क्रिडा स्पर्धा व ठाणे जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा या स्पर्धेत पारितोषिक मिळवणारे खालील प्रमाणे स्पर्धक आहेत.
१) रांगोळी स्पर्धा- व्दितीय पारितोषिक-श्रीम. किमया पवार
२) गायन स्पर्धा- श्रीम. जयश्री धायगुडे
३) ४०० मी.धावणे (रिले)-प्रथम पारितोषिक श्री. वामन बांगारा
४)१०० मी.धावणे(महिला)-प्रथम पारितोषिक-श्रीम.प्रतिक्षा सावंत
५) १०० मी.धावणे (पुरुष)द्वितीय पारितोषिक-श्री.छगन म्हात्रे
तृतीय पारितोषिक-श्री.वामन बांगारा
६)२००मी.धावणे(महिला)-व्दितीय पारितोषिक-श्रीम.प्रतिक्षा सावंत
७) २००मी.धावणे (पुरुष) तृतीय पारितोषिक-श्री.वामन बांगारा
८) बॅडमिंटन (पुरुष)-प्रथम पारितोषिक-श्री.चंद्रकांत पवार
व्दितीय पारितोषिक-श्री.संजय कुंभार
९) गोळा फेक (महिला) प्रथम पारितोषिक श्रीम.प्रतिक्षा सावंत
१०) रस्सीखेच (महिला)-व्दितीय पारितोषिक
११) रस्सीखेच (पुरुष)-व्दितीय पारितोषिक
१२) क्रिकेट (पुरुष)-तृतीय पारितोषिक
या पारितोषिक मिळवणारे स्पर्धकांचा ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी मा. प्रशासक डॉ.प्रशांत रसाळ यांच्या हस्ते अंबरनाथ नगरपरिषद स्थायी समिती सभागृह येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा. मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, उपमुख्याधिकारी उमेश राऊत व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments