ब्लॅक अँड व्हाईट झिडके-अंबाडी वार्ताहर
भिवंडी तालुक्यातील झिडके-अंबाडी नाका येथील सुप्रसिद्ध " पल्लवी कृषी सेवा केंद्राचे" प्रोपायटर- समीर सिताराम ठाकरे यांचा " राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर लिमिटेड मुंबई" या कंपनीकडून उत्कृष्ट विक्रेता म्हणून सन-2025/26 या वर्षांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला,या पुरस्काराचे मानकरी म्हणून समीर ठाकरे यांचा 25 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथील कार्यक्रमात RCF कंपनीचा " बेस्ट डीलर अवॉर्ड " देऊन सन्मान करण्यात आला.
झिडके-अंबाडी नाका येथे " पल्लवी कृषी सेवा" केंद्र गेल्या 17 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना खते,बी बियाणे,कीटकनाशके शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य किंमतीत उपलब्ध करून दिली जातात.तसेच सदर केंद्र हे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील असल्यामुळेच शेतकऱ्यांना विविध पिक हंगामात प्रत्येक्ष शेतावर जाऊन योग्य असे मार्गदर्शन केले जाते.त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावे यांचेही आयोजन केले जाते.आदि बाबींचा आढावा घेऊन,पल्लवी कृषी सेवा केंद्र झिडके-अंबाडी नाका यांचे प्रोपायटर समीर ठाकरे यांचा RCF कंपनीकडून जो उत्कृष्ट विक्रेता म्हणून सन्मान केला,तो योग्यच आहे,त्यामुळे परिसरातून समीर ठाकरे यांचे अभिनंदन केले जात आहेत.
Post a Comment
0 Comments