ब्लॅक अँड व्हाईट (मुरबाड)-दिलीप पवार
76 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र आनंदात व जल्लोषात साजरा होत असताना मुरबाड शहर व तालुक्यातही सर्व शासकीय कार्यालये , शाळा, महाविद्यालये अशा सर्वच ठिकाणी उत्साहात साजरा झालेला पाहायला मिळाला.स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ध्वजारोहण केले.
तर तहसीलदार अभिजित देशमुख यांनी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात ध्वज फडकाविला. तसेच मुरबाड नगरपंचायतच्या कार्यालया समोर प्रभारी नगराध्यक्षा मानसी देसले यांनी ध्वजारोहण केले.यावेळी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या सह माजी नगराध्यक्ष, सर्व आजी माजी नगरसेवक, नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर तहसिल कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक संदिप गिते, मुख्याधिकारी मनोज म्हसे, उपअभियंता कैलास पतिंगराव यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
तर मुरबाड पोलीसांच्या वतीने ध्वजाला मानवंदना देण्यात आली. विशेष अभिमानास्पद बाब म्हणजे या ध्वजारोहणासाठी तालुक्यातील बुजुर्ग व्यक्तीमत्व हिरामण माळवे (गुरुजी) व दळवी मामा दरवर्षी उपस्थित राहून ध्वजाला सलामी देतात. यावेळी मुरबाड मधिल स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक संतोष पिसाट, विजय शहा,हेरंब देहेरकर यांचा तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सन्मान करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मुरबाड शहरासह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा, सर्व महाविद्यालये सरकारी निमसरकारी आस्थापने , कारखाने अशा सर्व ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.मुरबाड मधील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुरड्यांनी गाण्याचा माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या परंपरेतून एकतेचा,अखंडतेचा व समानतेचा संदेश दिला.
Post a Comment
0 Comments