Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

              ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आज ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सकाळी ०७.३० वाजता राष्ट्र ध्वज फडकावून आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी  ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड , शहर अभियंता अनिता परदेशी,महापालिका उपायुक्त, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.यासमयी अग्निशमन दल, सुरक्षा दल , स्थानिक पोलीस दल व msf चे जवान यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

 यावेळी   घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या  १४ गुणवंत सफाई कर्मचा-यांचा  महापालिका आयुक्त व उपस्थित  इतर अधिकारी  यांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तु प्रदान करून सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्त -२,योगेश गोडसे यांनी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली. याप्रसंगी परिमंडळ 2 चे  उपायुक्त अवधुत तावडे, माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तद्नंतर आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू तसेच महापालिका अधिकारी/ कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.

त्यानंतर डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील  दीडशे फुटी उंच ध्वज फडकवून महापालिका आयुक्‍त डॉ. इंदु राणी जाखड यांनी ध्वजवंदन  केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त,हर घर संविधान ही संकल्पना  सर्व मिळून राबवू आणि संविधानाचे पालन करून देशाला पुढे नेऊ अशी असे  सांगत आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी   SRPF commandent गोकुलजी आणि परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांचीही समयोचित भाषणे झाली.

यासमयी कल्याण ग्रामीणचे आमदार  राजेश मोरे, इतर माजी पदाधिकारी, महापालिका अधिकारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी ,नागरिक बहुसंख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments