Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भक्तिचा सुगंध सर्वदूर पसरवत 58व्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता

 


"जीवनाचा उद्देश केवळ भौतिक उपलब्धि नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे"
- सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे.’’ असे उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनीे महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. या तीन दिवसीय संत समागमाची रविवारी रात्री विधिवतपणे यशस्वीरित्या सांगता झाली. या संत समागमामध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो लोकांनी भाग घेतला.

सतगुरु माताजी पुढे म्हणाल्यामानवी जीवन एवढ्याचसाठी श्रेष्ठ मानले गेले आहेकी या जीवनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे. परमात्मा निरकार असून या परमसत्याला जाणणे हेच मनुष्य जन्माचे परम लक्ष्य होय. शेवटीसतगुरु माताजींनी संागितलेकी जीवन एक वरदान असून ते परमात्म्याशी क्षणोक्षणी संलग्न राहून जगायला हवे. क्षणोक्षणी जीवन योग्य दिशेने व्यतीत केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळू शकते आणि आम्ही अनंताच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो.


निरंकारी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य सेवादल रॅली आयोजित करण्यात आली ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष स्वयंसेवकांनी आपापल्या खाकी व निळîा वर्दीमध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला. या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकांचे सादरीकरण सेवादल सदस्यांकडून करण्यात आले ज्यांच्या माध्यमातून भक्तीमध्ये सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध भागातील, जसे कोकण, मराठवाड़ा, खान्देश, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र येथील सेवादल यूनिट्सनी या रॅलीमध्ये प्रेरणादायक प्रस्तुती सादर केल्या.  

समागमाच्या तिसऱ्या दिवशी एका बहुभाषी कवि दरबारचे आयोजन करण्यात आले ज्याचे शीर्षक होते ‘विस्तार - असीम की ओर।’ महाराष्टा व्यतिरिक्त देशाच्या विविध भागातून आलेल्या एकंदर 21 कवींनी मराठी, हिन्दी, इंग्रजी, कोंकणी, भोजपुरी आदि भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ करत मिशनचा दिव्य संदेश प्रसारित केला. श्रोत्यांनी या कवि दरबाराचा भरपूर आनंद लुटण्याबरोबरच कवि सज्जनांचे कौतुक केले. 



या समागमात ’विस्तार-असीम की ओर’ या मुख्य विषयावर आधारित निरंकारी प्रदर्शनी श्रोत्यांसाठी विशेष आर्कषणाचे केंद्र बनून राहिली. या प्रदर्शनीचे मुख्यतः दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आले होते. प्रथम भागात मिशनचा इतिहास, विचारधारा आणि सामायिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त सतगुरुंनी देश व विदेशांमध्ये केलेल्या मानव कल्याण यात्रांची सचित्र माहिती देण्यात आली होती तर दुसÚया भागात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत राबविल्या जाणाÚया सामाजिक कार्याची माहिती दर्शविण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण भारतात राबविला जात असलेला प्रोजेक्ट वननेस वन तसेच प्रोजेक्ट अमृत हे उल्लेखनीय होते. या शिवाय निरंकारी इंस्टिट्यूट ऑफ म्युझिक अॅन्ड आर्ट्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसले.     

समागमामध्ये काईरोप्रॅक्टिक थेरपी द्वारे निःशुल्क उपचार करण्याचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. ही थेरपी मुख्यत्वे पाठीच्या कण्याच्या विकारांशी निगडित आहे. या तंत्राने उपचार करणारी ऑस्ट्रेलिया, यूनायटेड किंगडम, फ्रांस, अमेरिका येथील 18 डॉक्टरांची टीम आपल्या निष्काम सेवा प्रदान करत होती. यावर्षी जवळपास 3500 लोकांनी या थेरपीद्वारे उपचाराचा लाभ घेतला. 

समागम स्थळावर एक 60 बेडचे हाॅस्पिटल तयार करण्यात आले होते ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत आयसीयूची सुविधाही उपलब्ध होती. या व्यतिरिक्त तीन ठिकाणी निःशुल्क होमियोपॅथी व डिस्पेन्सरींची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये वायसीएमए हाॅस्पिटल तसेच डी वाय पाटील हाॅस्पिटलने महत्वपूर्ण योगदान दिले. समागम स्थळावर 11 अॅम्ब्युलन्स तैनात होत्या. स्वास्थ्य सेवेमध्ये 282 डाॅक्टर्स तसेच जवळपास 450 सेवादल स्वयंसेवक आपल्या सेवा देत होते.
 
समागमामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी निःशुल्क महाप्रसाद म्हणजेच लंगरची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आली होती. या लंगर व्यवस्थेमध्ये 72 क्विंटल तांदूळ एकाच वेळी सिजवला जाण्याची क्षमता होती तसेच 70 हजार भाविक एकाच वेळी भोजन करु शकतील अशी व्यवस्था होती. सतगुरु प्रवचना व्यतिरिक्त 24 तास लंगर उपलब्ध होते. या व्यतिरिक्त अत्यल्प दराने अल्पोपहार, मिनरल वाॅटर व चहा-काॅफी इत्यादि उपलब्ध करुन देण्यासाठी 4 कॅन्टीन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments