मोबाईल मुळे मनुष्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो
- पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली खैरमोडे
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय इंग्रजी आणि मराठी माध्यमाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका ज्योती दीदी, पूनम दीदी, रेणुका दीदी आणि शाळेची माजी विद्यार्थिनी पोलीस निरीक्षक स्वप्नाली खैरमोडे उपस्थित होते. ज्योती दीदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पूनम दीदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थी मित्रांनो आपण आई-वडिलांबरोबर प्रामाणिक राहा मेडिटेशन करा. संयम शांत रहाणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुणवत्ता वाढते तसेच सकारात्मक विचार निर्माण होऊन मानव जातीला पुढे नेतात. स्वप्नाली खैरमोडे सम्राट अशोक शाळेची माजी विद्यार्थिनी एमपीएससी परीक्षा पास होऊन पोलीस निरीक्षक झाली. म्हणून शाळा व संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार केला. स्वप्नाली आपल्या भाषणात म्हणाली मला या शाळेने शिस्त शिकवली ती माझ्या कामी आली संविधानात्मक अधिकारामुळे मी एमपीएससी परीक्षा पास होऊन पोलीस अधिकारी झाली मुलांनो तुम्हाला पुढे जायचे असेल तर टी.व्ही. मोबाईल पासून लांब राहा मोबाईल मुळे आपल्या मानसिकतेवर परिणाम होतात आई-वडिलांनी मुलांना मोबाईल देऊ नये आमच्याकडे बाल वयाचे गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर येतात.
.इयत्ता तिसरी ते सहावी च्या विद्यार्थ्यांनी कवायत संचलन केले इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शहर वाहतुकीचे सिग्नल कवायतीच्या माध्यमातून सादर केले. इयत्ता नववी एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वज संचलन करत तिरंगी ध्वजास मानवंदना दिली. भारत माता व इतर महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर पाहुण्यांचे आभार मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी मानले.
Post a Comment
0 Comments