Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल 

         - महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़

           ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्यास लोकशाहीचे बळकटीकरण होण्यास मदत होईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले.आज शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिन महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आज संपन्न झाला. यासमयी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गामार्फत सामूहिक मतदान शपथ घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ, उपआयुक्त प्रसाद बोरकर, अतुल पाटील, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने देखील मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.

यावेळी *“Nothing Like Voting, I Vote for sure”* या शासनाच्या थीमनुसार महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments