Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत ५ बांगलादेशी नागरीकांवर कारवाई

 

कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलीसांची कारवाई

            ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 


पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने बांगलादेशी नागरीकांवर कारवाईची मोहिम परिमंडळ ३ कल्याण हद्दीत सुरु असुन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मधील मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलीसांनी कारवाई करत ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.  

 

मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत टाटानाकादेशमुख होम्स् जवळगांधीनगर झोपडपटटीकल्याण पुर्व आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण पश्चिम रेल्वे परिसर या ठिकाणी बांगलादेशी नागरीक कोणत्याही कागदपत्राशिवाय व भारत सरकारने विहीत केलेल्या मार्गाव्यतिरीक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन बेकायदा वास्तव्यास असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्याने मानपाडा व महात्मा फुले चौक पोलीसांनी स्वतंत्र पथके तयार करुन दोन्ही ठिकाणी धाडी टाकुन पडताळणी केली असता एकुण ५ बांगलादेशी नागरिक विनापरवाना भारतात राहत असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांची चौकशी करुन त्यांचेपैकी  ४ बांगलादेशी नागरीकांवर मानपाडा पो.स्टे. आणि १ बांगलादेशी महिला नागरीकांवर महात्मा फुले चौक पो.स्टे. मध्ये गुन्हे दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 


Post a Comment

0 Comments