ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
२३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आयोजित आंतर शालेय विविध स्पर्धांचा बक्षिस समारंभ मॉडेल इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या आमदार सौ. सुलभा ताई गायकवाड ह्यानी आपल्या भाषणात बक्षिस विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले." विद्यार्थ्यानी आपल्या कला गुणांना वाव देताना आपल्या परिसरातील आक्षेपार्ह घटनांची दखल घेऊन सावधगिरी बाळगावी, त्याचप्रमाणे जनजागृती करावी" असे आवाहन केले.
तसेच उपस्थित सुदर्शन एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष सुरेश पाटील हे विद्यार्थ्यांच्या सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रचंड प्रभावित झाले. ते म्हणाले की क्रांतिकारक राष्ट्रपुरुषांच्या स्मृतींना जागवणारि माझ्या माहितीत एकमेव संस्था आहे, जी गेले २७ वर्षे कोरोनाचा काळ वगळता कार्यरत आहे. संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. दोन विद्यार्थ्यांंना त्यांनी उत्कृष्ट सादरीकरणासाठी रोख बक्षिसे दिली. चित्रकला, निबंध,शुद्धलेखन ,रांगोळी, संपूर्ण सूर्य नमस्कार,बैठका,संपूर्ण वंदेमातरम पाठांतर ,राष्ट्रभक्ती पर वेषभूषा व राष्ट्रभक्ती पर नृत्य स्पर्धा या स्पर्धांसाठी १५०० विद्यार्थ्यानी भाग घेतला होता, त्यामधून ८० विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धांचे परीक्षण सुभाष मते ,मुकुंद गायधनी, राजेश मानवडे,चयन रॉय, सुनिल चव्हाण,नीलम व्यवहारे,ज्योती शहाणे, नमिता महाडिक, इंद्रायणी च व्हाण,उज्ज्वला मोरे, दर्शना वाघ, पूनम पार टे यांनी केले.
व्यासपीठावर मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, अॅड. राजेंद्र सटाळे,,सिद्धेश देवळेकर, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर, कैलास सुर्वे,उपाध्यक्ष,ईस्ट कल्याण वेल्फेअर असो.सौ. वर्षा कळके स्त्री मुक्ती संघटना अध्यक्षा .गणेश विद्यामंदिर शाळेच्या सौ.ललिता मोरे,कवयित्री सौ. सुरेखा गावंडे हे मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments