ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे जिल्हा परिषद आयोजित क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातून लंगडी या खेळात ठाणे जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान ,तसेच 50 मीटर धावणे या स्पर्धेत कुमारी रूपाली मंगेश पागी हिनेही ठाणे जिल्ह्यात प्रथम दिनाचा बहुमान मिळविला.जिल्हा परिषद शाळा भूईशेत, केंद्र चिंबिपाडा, तालुका भिवंडी येथील सर्व विद्यार्थ्यांनी आहेत.
दुर्गम भागातून आलेल्या या लहान मुलींचे सर्व थरातून आज कौतुक होत आहे. त्यामुळे मुलींना प्रोत्साहित करण्याचं काम या शाळेतील शिक्षक श्री नाना मारुती ठाकूर सर, सौ सुनेत्रा अरुण गायकवाड मॅडम, सौ सुनिता अनिल सोनावणे मॅडम व मुख्याध्यापिका सौ सुनिता तुकाराम शिंदे मॅडम यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या कार्यक्रम प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे मा शिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते या शाळेला बक्षीस वितरण करण्यात आले.ठाणे येथील विस्तार अधिकारी मा श्री आशिष झुंजार राव साहेब व भिवंडी गटशिक्षण अधिकारी मा श्री संजय अस्वले साहेब, यांनीही विद्यार्थी चे विशेष कौतुक केले.व चिबीपाडा केंद्राचू केंद्रप्रमुख मा श्री संदीप परदेशी सर यांचेही मोलाचे योगदान आहे.
Post a Comment
0 Comments