या वर्षी १० वी व १२ वी परीक्षांकरीता केंद्र संचालक, पर्यवेक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने मागे घेतला असून शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांच्या मागणीप्रमाणे पुर्वीप्रमाणेच परीक्षा होणार असल्याचे प्रकटन बोर्डाने प्रसिद्ध केले आहे.
कॅापी नियंत्रणासाठी १० वी व १२ वी परीक्षांच्या केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षण करणारे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला होता. या निर्णयास शिक्षण क्रांती संघटनेने प्रखर विरोध करून बहिष्कार टाकण्याचा तसेच उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा मंडळाच्या अध्यक्षांना दिला होता.
पर्यवेक्षण व केंद्र संचालन नियोजनाकरीता शिक्षणाधिकारी यांनी शाळांमधून केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांच्या याद्या मागविल्या होत्या त्या देण्यास शिक्षण क्रांती संघटनेने असहकार सुरू केला होता. अखेरीस त्रस्त झालेल्या शिक्षण मंडळाने सरमिसळीचा निर्णय मागे घेऊन कॅापी नियंत्रणासाठी बैठे पथक, भरारी पथक, जिल्हा व केंद्र स्तरीय दक्षता समिती आदी पुर्वीप्रमाणे सुरू असलेल्या उपाययोजनाच सुरू ठेवण्याचा निर्णय प्रटनाद्वारे जाहीर केला आहे. हा निर्णय रद्द होण्यासाठी अनेक संघटनांनी पुढाकार घेतला होता मात्र शिक्षण क्रांती संघटनेने या आंदोलनाचा तीव्रतेने आरंभ केला होता व जोरकसपणे मागणी लाभन धरली होती अशी चर्चा सर्वत्र आहे.
Post a Comment
0 Comments