स्वामी विवेकानंद संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवा दिन उत्साहात संपन्न…
ब्लॅक अँड व्हाईट शहापूर प्रतिनिधी
रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्थेचा २८ वा वर्धापन दिन आणि स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाचा कार्यक्रम शहापूर तालुक्यातील मौजे पाली येथील संस्थेच्या कार्यालयात मोठया आनंद उत्साहात संपन्न झाला.
हा कार्यक्रम मानव सेवा विकास फाऊंडेशन, अमरावती या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व माजी प्राचार्य व्ही.एस.पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वाडा तालुक्यातील एस.जी.देशमुख शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर देशमुख, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक व विशेष वसुली अधिकारी काशिनाथ तारमळे, उत्कर्ष महाविद्यालयाचे माजी सेक्रेटरी अरुण परशराम भालेकर, लायन्स क्लब ऑफ शहापूरचे सेक्रेटरी मुकेश दामोदरे, वासिंद येथील कम्प्लिट कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक विनायक विष्णू पवार, वासिंद चॅलेंजर्स ट्रेकर्सचे संचालक श्याम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन केले. स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर सर यांनी उपस्थितांचे सहर्ष स्वागत करून संस्थेने आजतागायत विविध क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य व संस्थेच्या भविष्यातील योजना आदी बाबींवर प्रकाश टाकत आपले प्रास्ताविक सादर केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.एस.पाटील सर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, “राष्ट्र उभारणीत तरुणांचा सिंहाचा वाटा असतो. देशाचा विकास करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची ताकद युवकांत आहे. तरुण हे देशाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्यामुळेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवापिढीने राष्ट्रविकासासाठी झोकून काम करण्याची नितांत गरज आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीनेही आपल्या देशाच्या विकासासाठी झटले पाहिजे.”
यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सचिव संजय तरणे, सहसचिव तथा पोलीस पाटील साईनाथ तरणे, अन्य पदाधिकारी अनंता तरणे, गीतांजली म्हसकर, रसिका म्हसकर, शर्वरी तरणे तसेच मौजे पाली येथील ग्रामस्थ शारदाबाई म्हसकर, अनिल व कैलास म्हसकर, दर्शना व प्रगती म्हसकर, वैशाली भोईर आणि संकेत व सलोनी तरणे, विद्या व जीवन म्हसकर तसेच पंचक्रोशीतील ओंकार देशमुख, अजित दुधाळे अन्य युवा-युवती उपस्थित होते.
संजय तरणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
.jpg)

Post a Comment
0 Comments