Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी क्षेत्रातील आशा वर्कर्स दिवाळी बोनसपासून अद्यापही वंचित

 

दिवाळी बोनस आणि इतर मागण्या

मान्य करण्याची आशा वर्करची मागणी


                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

दिवाळी होऊन दोन महीने उलटले तरी देखील अद्यापही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 700 आशा वर्कर्स दिवाळी बोनस पासून वंचित असून हा दिवाळी बोनस देण्यासह इतर मागण्या मान्य करण्याची मागणी आशा वर्कर्सने केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आशा वर्कर्स ना आपल्या विविध मागण्यासाठी वणवण कराण्याची वेळ आली आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात गेली 15ते 16 वर्षोपासून आशा वर्कर्स म्हणून काम करीत असलेल्या आशा वर्कर्स तसेच नव्याने घेतलेल्या अशा एकंदरीत 720 आशा वर्कर्सना अद्याप देखील नियुक्ती पत्र मिळाले नाहीत. लगतच्या  पालघर जिल्ह्यातील आशा वर्कर्स ना नियुक्त पत्र मिळते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आशा वर्कर्सना मिळत नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो अशी खंत ठाणे -पालघर जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियन सचिव काँ गीता माने यांनी व्यक्त केली आहे.

आशा वर्कर्स महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच शासनाचे आरोग्य विषयक सर्वे, शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी साठी माध्यम म्हणून कार्यरत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी महत्वाची भुमिका निभावली होती. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे सर्व आशांना जाहीर केलेला 5 हजार दिवाळी बोनस त्वरीत मिळावा. आशांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे नियुक्तीपत्र मिळाली पाहीजे. महानगरपालिका अंतर्गत काम करणा-या आशा कर्मचा-यांना इतर महानगर पालिकांप्रमाणे ठोक मानधनावर सामावून घ्यावे.

कल्याण डोंबिवली म. न. पा. ने आशांच्या कामाची वेळ व कामाचा प्रकार ठरवून दिला पाहिजे. आरोग्य विभागाशी संबंधीत नसणारी कामे करण्यास भाग पाडणे व सकाळी ९ ते सायं. ५ वा. पर्यंत काम नसताना प्राथमिक आरोग्य केंद्रांवर थांबवून ठेवणे हे प्रकार बंद झाले पाहीजे. या आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवदेन देण्यात आले. या प्रसंगी ऊबर्डे, मांडा,मोहने, आंबिवली, टिटवाळा, चिकणघर, आधारवाडी, गोदरेज हिल आदि परिसरात कार्यरत असणार्या आशा वर्कर्स एकत्र होत्या.


Post a Comment

0 Comments