कल्याण पश्चिमेतील रमाबाई आंबेडकर उद्यानातील दोन गाळे केडीएमसीने केले सील
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क प्रभागास प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कल्याण पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर उद्यान येथील दोन गाळ्यांपैकी एका गाळ्यातील साहित्य बाहेर काढून दोन्ही गाळे सील करण्याची कारवाई आज करण्यात आली. तसेच एका गाळ्यात भाजी विक्री करणाऱ्या योगेश घुगे यांच्या दुकानातील सुमारे 50 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या व त्यांच्यावर 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र, त्यांचा सर्व भाजीपाला आणि इतर सामान परत करण्यात आले आहे.
हि कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात, अधीक्षक उमेश यमगर, स्वच्छता निरीक्षक जगन्नाथ वड्डे, फेरीवाला पथकप्रमुख चिंतन, देविदास आणि गणेश दळवी यांच्या मार्फत करण्यात आली. प्लास्टिक पिशव्यांविरोधात महापालिकेमार्फत कठोर कारवाई करण्यात येत असून, भाजी विक्रेते यांनी एकल प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments